Wednesday, September 03, 2025 08:01:28 PM

सोलापुरात आणखी एक धक्कादायक प्रकार; नराधम बापाने घेतला पोटच्या मुलीचा जीव

दक्षिण सोलापुरातील कुसूर येथील कोठे वस्तीवर पुरलेल्या 8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह मंद्रूप पोलिसांनी खोदून बाहेर काढला आहे. हा खून आहे की आकस्मिक मृत्यू आहे याचा उलगडा शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे.

सोलापुरात आणखी एक धक्कादायक प्रकार नराधम बापाने घेतला पोटच्या मुलीचा जीव

रवी ढोबळे. प्रतिनिधी. सोलापूर: दक्षिण सोलापुरातील कुसूर येथील कोठे वस्तीवर पुरलेल्या 8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह मंद्रूप पोलिसांनी खोदून बाहेर काढला आहे. हा खून आहे की आकस्मिक मृत्यू आहे याचा उलगडा शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा: राजगुरुनगरच्या चांडोतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नेमकं प्रकरण काय?

अज्ञात कारणामुळे, ओमसिद्ध कोठे यांनी पोटच्या मुलीला म्हणजेच श्रावणीला (वय: 8) जीवे मारून जमिनीत पुरवल्याचे समजले. यावेळी, रेवन सिद्ध कोठे वस्तीवर आले. तेव्हा, वस्तीवर मृत मुलीचे अन्य नातेवाईकही होते. या घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी पोलिसांना बोलविले. तेव्हा, बांधकाम करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यावर माती झाकलेलली आली. यावेळी पोलिसांनी खोदकाम करून श्रावणीचा मृतदेह बाहेर काढला. यादरम्यान, तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता. तसेच, हलका पाऊस असल्यामुळे सर्व अंगाला माती चिटकली होती. यावेळेस, श्रावणीच्या मावशीने आणि आजोबांनी तिला ओळखले. त्यानंतर, शवविच्छेदनासाठी श्रावणीचा मृतदेह मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला. श्रावणीची आई वनिता कोठे ही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया असल्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. श्रावणीची आजी महादेवी आणि आजोबा रेवणसिद्ध कोठे हे मुलाच्या घरापासून 100 मीटर लांब राहतात. तर कुसूर गावातच श्रावणीची आई वनिता यांच्या आईकडे मुलगी नंदीनी,शारदा आणि मुलगा सिद्धार्थ राहत होते. त्यामुळे, श्रावणी आणि वडील ओमसिद्ध कोठे हे वस्तीवर दोघेच होते.
 


सम्बन्धित सामग्री