Wednesday, August 20, 2025 05:23:24 PM

ताप्ती गंगा एक्सप्रेसवर काही समाजकंटकांकडून दगडफेक

हिंदू राष्ट्र समन्वय समितीची दोषींवर कठोर कारवाईची मागणी

ताप्ती गंगा एक्सप्रेसवर काही समाजकंटकांकडून दगडफेक

जळगाव : येथे रविवारी, १२ जानेवारी रोजी ताप्ती गंगा एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात बी-६ वातानुकूलित डब्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या. त्यामुळे महाकुंभसाठी प्रवास करणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेच्या निषेधार्थ हिंदू राष्ट्र समन्वय समितीने विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. समितीने दोषींना तत्काळ शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही सुचवले.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर कठोर उपाययोजना करावी आणि भाविक प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री द्यावी, अशी जोरदार मागणी केली.

हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग
हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुळेकर आणि विश्व हिंदू परिषदेचे संघटक देवेंद्र भावसार यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी भाविक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली.

रेल्वे प्रशासनाने अशा घटनांवर आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलावीत आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सक्षम व्यवस्था करावी, अशी मागणी करत त्यांनी प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला.

महाकुंभासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर असून अशा घटनांना प्राधान्याने थांबवण्यासाठी पोलिसांनी आणि रेल्वे प्रशासनाने समन्वय साधावा, अशी हिंदू राष्ट्र समन्वय समितीची भूमिका आहे.

👉👉 हे देखील वाचा : वर्ध्यात घटस्फोटाच्या प्रकरणांची वाढ 12 महिन्यात 820 प्रकरणे...
 


सम्बन्धित सामग्री