Monday, September 01, 2025 02:29:57 PM

बापचं बनला वैरी; ३ वर्षीय चिमुकलीसोबत घडलं काय?

नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फसणारी ही घटना आहे. नवी मुंबईतील घणसोलीत ३ वर्षाच्या पोटच्या मुलीवर बापानंच लैंगिक अत्याचार केलेत.

बापचं बनला वैरी ३ वर्षीय चिमुकलीसोबत घडलं काय

नवी मुंबई: नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फसणारी ही घटना आहे. नवी मुंबईतील घणसोलीत ३ वर्षाच्या पोटच्या मुलीवर बापानंच लैंगिक अत्याचार केलेत. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. 

याबाबत सविस्तर 

नवी मुंबईच्या घणसोली रोड परीसरात ही घटना घडली आहे. २६ डिसेंबरला पीडित तीन वर्षीय मुलगी घरात एकटी होती. आरोपीबापाने आपल्या पोटच्या मुलीसोबत अश्लील आणि लैगिंक चाळे केले. नंतर जबरदस्तीनं लैगिंक अत्याचार केला. ही धक्कादायक माहिती मुलीनं आपल्या आईला सांगितलीं आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

आईने  मुलीला आणखीन विचारपूस केली असता, बाप गेले अनेक दिवसांपासून हे काळं कृत्य करत असल्याचं समोर आलं. यानंतर पीडित मुलीच्या आईनं या लज्जास्पद कृत्याबद्दल बापाला जाब विचारला असता नराधम बापानं आईला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याच जाचला त्रासलेल्या महिलेनं तातडीने रबाळे पोलीस ठाणे गाठले. 

याप्रकरणी  रबाळे पोलिसांनी नराधम बापाविरोधात  पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्यात. दरम्यान बापानेच पोटच्या पोरीसोबत असे कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. 


सम्बन्धित सामग्री