स्वप्नील झोडगे. प्रतिनिधी. अहिल्यानगर: नुकताच अहिल्यानगरमधील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पाणी घेण्यासाठी विक्रम कोळी नावाचा तरुण हॉटेलमध्ये गेला होता. यादरम्यान, विक्रमचा हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला धक्का लागला. मात्र, धक्का लागल्यामुळे विक्रम कोळीला बेधडक मारहाण करण्यात आली. यामध्ये, मारहाण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. तसेच, तिन्ही गुन्हेगारांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: गोंदियाच्या आमगाव-देवरी महामार्गवर वाघाचे दर्शन
नेमकं प्रकरण काय?
विक्रम कोळी हा तरुण पाणी घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता. यादरम्यान, या तरुणाचा हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला धक्का लागला होता. धक्का लागल्याचा राग धरून संबंधित व्यक्तीने विक्रम कोळी यांना बेधडक मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर शिवीगाळ करणाऱ्या तरुणाच्या साथीदाराने विक्रम कोळी यांच्या डोक्यात लाकडी ठोकळा आणि लाथा बुक्क्याने मारहाण करून जखमी केले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या संदर्भात जामखेड पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सोमनाथ मोहोळकर, असीम जब्बार शेख आणि छोट्या हरून शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.