Tuesday, September 09, 2025 08:06:33 PM

Aly Goni Controversy: 'मी मुस्लीम आहे म्हणून...'; अली गोनीने सांगितलं ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलण्यामागचे कारण

फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केले की, 'मी कधीही विचार केला नव्हता की ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याने इतका मोठा प्रॉब्लेम होईल. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो.'

aly goni controversy मी मुस्लीम आहे म्हणून अली गोनीने सांगितलं ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलण्यामागचे कारण

Aly Goni Controversy: लोकप्रिय टीव्ही अभिनेता अली गोनीचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये जस्मिन भसीन आणि तिची मैत्रीण निया शर्मा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत होत्या. मात्र, अली गोनीने व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचा जयघोष केला नाही. यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले. दरम्या आता अलीने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केले की, 'मी कधीही विचार केला नव्हता की ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याने इतका मोठा प्रॉब्लेम होईल. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो. फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही किंवा अभिनय करताना सुद्धा नाही.' अली पुढे म्हणाला, 'मी तिथे काय करतोय याचीही कल्पना नव्हती. सोशल मीडियावर काय चाललंय ते बघत होतो, पण जर मला कोणत्याही धर्माचा अनादर करायचा असता, तर मी इतका तयार होऊन तिथे गेलो. मी पहिल्यांदाच गणपतीची पूजा अनुभवायला गेलो होतो आणि मला त्या रीती-रिवाजांची माहीत नव्हती.' 

हेही वाचा Kajal Aggarwal Accident: 'मी पूर्णपणे सुरक्षित आहे...'; अपघातात मृत्यू झाल्याच्या अफवांवर काजलने प्रतिक्रिया

दरम्यान, अलीने हेही सांगितले की, 'माझ्या धर्मात पूजा नाही, आम्ही नमाज पठण करतो, पण आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो. आमच्या कुराणमध्येही हे नमूद आहे. मी जम्मूमध्ये वाढलो आहे, जिथे अनेक मंदिरं होती आणि मी अनेकदा मित्रांसह मंदिरांमध्ये गेलो आहे. त्यामुळे माझ्याकडून कोणत्याही धर्माबद्दल चुकीचे बोलणे शक्य नाही.'

हेही वाचा - Navya Nair : चमेलीच्या फुलांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत, मेलबर्न एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? 

तथापी, अली गोनीने त्याने व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडिओचा संदर्भही दिला. जस्मिनने त्याच्या हनुवटीला हात लावला आणि ‘हा सुद्धा क्युट आहे’ असं म्हटलं. अनेकांनी चुकीच्या अर्थाने हा व्हिडिओ पाहून कमेंट्स केल्या असंही अलीने यावेळी नमूद केलं. अली म्हणाला, 'मी मुस्लीम आहे म्हणूनच मला ट्रोल केलं जातंय. माझ्यासाठी कोणताही धर्म महत्त्वाचा नाही, फक्त माणूस महत्त्वाचा आहे. अनेकदा वाईट कमेंट्स पाहून दु:ख होतं, पण मी प्रत्येक धर्माचा आदर करतो.' 


सम्बन्धित सामग्री