Monday, September 01, 2025 12:59:33 PM

Pushpa 2 चित्रपट पाहण्यासाठी जतमध्ये तुफान गर्दी

तिकीट मिळत नसल्याने तिकीट केबिनवर किरकोळ दगडफेक. पोलिसांनी तात्काळ धाव घेत मॉप केला शांत.

pushpa 2 चित्रपट पाहण्यासाठी जतमध्ये तुफान गर्दी

सांगली: सांगली  जिल्ह्यातील जत तालुक्यात ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागातून प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली. जत शहरातील तीन थिएटरमध्ये चित्रपट हाऊसफुल्ल झाल्याने तिकीट बुकिंग बंद करण्यात आले. यामुळे तिकीट मिळवण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांमध्ये गोंधळ उडाला.
गर्दीचा ताण वाढल्यानंतर काही संतप्त प्रेक्षकांनी तिकीट केबिनवर किरकोळ दगडफेक केली. या घटनेमुळे थिएटर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेनंतर पोलिसांनी थिएटर व्यवस्थापनासोबत समन्वय साधून शांततेत चित्रपटाचे प्रदर्शन सुरू राहील याची खात्री केली. दरम्यान, चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे ‘पुष्पा 2’ची लोकप्रियता स्पष्टपणे दिसून आली आहे.

चित्रपटप्रेमींच्या या उत्साहामुळे ‘पुष्पा 2’ हा ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरत आहे. जतसह परिसरातील अनेक ठिकाणी पुढील काही दिवसांसाठीही तिकीट विक्रीला जोरदार मागणी राहण्याची शक्यता आहे.

'>http://


सम्बन्धित सामग्री






Live TV