Rushi Panchami 2025: हिंदू धर्मात वेगवेगळे सण साजरे करतात. नुकताच श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे आणि भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ऋषीपंचमी साजरी केली जाते. हा सण सर्वांनी मिळून साजरा केल्यास उत्तम आहे. या दिवसाचे महत्त्व, पूजा आणि पद्धत जाणून घ्या..
ऋषी पंचमी व्रत म्हणजे काय?
ऋषीपंचमी हे एक स्वतंत्र व्रत असून ते महिलांद्वारे केले जाते. मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल, तर त्याचे पाप क्षालन करण्यासाठी हे व्रत करतात. या व्रतामुळे रजोदर्शनकाळातील स्त्रीच्या वासनादेहावर व मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते, असे सांगितले जाते. शास्त्रानुसार सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे असे ही म्हणतात.
हेही वाचा:Lalbaugcha Raja History: नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा 91 वर्ष जुना इतिहास, जाणून घ्या..
धार्मिक महत्त्व
भारतीय संस्कृतीत अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे. या ऋषींनी मानवाच्या कल्याण्यासाठी विविध प्रांतात अमुल्य कामगिरी केलेली आहे. अशा ज्ञानी, सद्गुणी प्रज्ञावंत आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी एक भाद्रपद ऋषी पंचमीचा दिवस राखून ठेवलेला असतो. ऋषीपंचमीचे व्रत केल्याने आपल्या हातून झालेल्या चुका आणि पापांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. हे व्रत सप्तर्षींच्या (कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ) योगदानाला आणि तपस्येला आदराने वंदन करण्यासाठी केले जाते. हे व्रत केल्याने व्यक्तीला शुद्धता, पवित्रता आणि सात्विकतेचा लाभ होतो आणि पूर्वजन्मातील दोषांपासूनही मुक्ती मिळते.
पूजा साहित्य
चौरंग, पाट, समई, तूपाचे निरांजन, शंख, घंटा, कलश, तांब्या भांडे, पळी, हळद, कुंकू, रांगोळी, हार, फुले, दुर्वा, पत्री, विड्याची पाने, फळे, सुपाऱ्या, नारळ, बदाम, खारिक, खोबरे, हळकुंड, सुट्टे पैसे, गूळ खोबरे, सौभाग्य वाण, कापसाची वस्त्रे, चौरंग किंवा पाटावर घालण्यासाठी वस्त्र, उदबत्ती, कापूर, गोमूत्र इ.या पूजेसाठी लागते.
हेही वाचा: Lord Ganesh Dream Meaning: तुम्हाला स्वप्नात गणपती दिसला, याचा अर्थ...
पूजा विधी
सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करावे. अपामार्ग (अघाडा) वनस्पतीचा वापर करून दात घासणे आणि शरीरावर माती लावून स्नान करणे शुभ मानले जाते. स्वच्छ जागेवर हळद, कुंकू किंवा रोळीने चौकोनी मंडल (चौक) बनवा. यावर सप्तर्षींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. जर मूर्ती उपलब्ध नसेल तर सात लहान वाटींमध्ये पाणी, तांदूळ, फुले आणि इतर पूजा सामग्री ठेवून त्यांचे प्रतीकात्मक पूजन करू शकता.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)