Sunday, August 31, 2025 01:14:02 PM

Ahmedabad Plane Crash: बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू

एअर इंडिया विमान अपघातात बदलापूरचा को-पायलट दीपक पाठक मृत्यूमुखी? कुटुंब अजूनही आशावादी, प्रशासनाकडून अधिकृत माहिती प्रतीक्षेत.

ahmedabad plane crash बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू

बदलापूर: अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या काल (12 जून) दुपारी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत बदलापूर येथील रहिवासी आणि त्या फ्लाईटचा क्रू मेंबर दीपक पाठक (वय 32) याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या घरी नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांची गर्दी होत आहे.

हेही वाचा: Major Flight Accidents in India: भारतातील आतापर्यंतचे सर्वात भीषण विमान अपघात

लंडनसाठी निघालेल्या एअर इंडिया AI-171 या विमानाचे टेकऑफनंतर काही वेळातच अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. या विमानात एकूण 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्याच क्रू सदस्यांपैकी दीपक पाठक हे बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरातील रावल कॉम्प्लेक्स येथे राहणारे होते. ही बातमी समजताच त्यांच्या घरी आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघात होण्याच्या काही वेळ आधीच दीपकने आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर मात्र कुटुंबातील कोणाचाही त्याच्याशी संपर्क झाला नाही. दीपक गेल्या 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, दोन विवाहित बहिणी आणि दीपक असा छोटा परिवार आहे.

हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: ज्योतिषीची भविष्यवाणी खरी ठरली? अहमदाबाद विमान अपघातानंतर चर्चेला उधाण

दरम्यान, अपघातानंतर अजूनही एअर इंडिया किंवा प्रशासनाकडून दीपकच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यांच्या मोबाईलवर अजूनही रिंग जात असल्याने कुटुंबीयांना त्याच्या जिवंत असण्याची आशा अजूनही आहे.


सम्बन्धित सामग्री