Thursday, September 04, 2025 10:49:20 PM

'न्याय अपूर्ण..', दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने अंकिता भंडारीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली नाराजी

दोषींना फाशीचीच शिक्षा हवी, असे अंकिता भंडारीच्या आई-वडिलांनी अत्यंत दु:खाने म्हटले आहे. यासाठी उच्च न्यायालयात जाणार, असे ते म्हणाले.

न्याय अपूर्ण दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने अंकिता भंडारीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली नाराजी

डेहराडून : कोटद्वारच्या दिवाणी न्यायालयाने अंकिता भंडारी हत्याकांडात पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने मान्य केले की, तिघांनी मिळून हत्या करून मृतदेह लपवला. पण, न्यायालयाच्या निर्णयावर कुटुंबीय असमाधानी असून उच्च न्यायालयात अपील करणार आहेत आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

उत्तराखंडच्या बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याकांडात शुक्रवारी कोटद्वारच्या दिवाणी न्यायालयाने मोठा निकाल दिला. न्यायालयाने सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांच्यासह मुख्य आरोपी पुलकित आर्य यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खटला सुमारे दोन वर्षे आणि आठ महिने न्यायालयात चालला. न्यायालयाने मान्य केले की तिन्ही दोषींनी मिळून अंकिताची हत्या केली आणि तिचा मृतदेह लपवण्याचा कट रचला. शिक्षा सुनावल्यानंतर, तिन्ही आरोपींना पोलीस कोठडीत न्यायालयाबाहेर आणण्यात आले आणि तुरुंगात पाठवण्यात आले.

हेही वाचा - Ankita Bhandari Case: 'मी गरीब आहे; म्हणून काय स्वतःला 10 हजारांत विकू का?', अंकिताचे व्हॉट्सअॅप चॅट ठरले पुरावा

अंकिताच्या पालकांनी दोषींना फाशी देण्याची मागणी केली. पीडितेचे कुटुंब न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी नाही. अंकिताचे वडील वीरेंद्र भंडारी म्हणाले की, त्यांना दोषींना फाशी होईल अशी अपेक्षा होती. त्यांनी सांगितले की ते या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देतील आणि दोषींना फाशी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अंकिताची आई सोनी भंडारी यांनीही न्यायालयाच्या निर्णयाला अपूर्ण न्याय म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने त्यांच्या मुलीची हत्या झाली त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा पुरेशी नाही. 

अंकिता भंडारीच्या हत्येच्या या प्रकरणाने राज्यभरातील लोकांना धक्का बसला होता आणि याप्रकरणी अनेक दिवसांपासून जनतेचा रोषही दिसून येत होता. आता कुटुंब उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. दोषींना फाशी देण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहे. अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणात एसआयटीने केलेल्या चौकशीनंतर न्यायालयात 500 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात 97 साक्षीदारांची नावे होती. यापैकी 47 साक्षीदारांना सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केले. सर्व साक्षीदारांच्या जबाब आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली.

हेही वाचा - 'हुंडा प्रकरणी तक्रार दाखल झाली नसली तरी, छळाचा आरोप खोटा ठरत नाही..,' उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी


सम्बन्धित सामग्री