Sunday, August 31, 2025 09:13:02 AM

14.8 किलो सोन्यासह विमानतळावर अटक झालेल्या रान्या रावचे वडील वडील रामचंद्र राव चर्चेत; याआधीही वादांमध्ये अडकले होते

कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर अटक करण्यात आली होती. तिचे वडील रामचंद्र राव हे पोलीस अधिकारी आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

148 किलो सोन्यासह विमानतळावर अटक झालेल्या रान्या रावचे वडील वडील रामचंद्र राव चर्चेत याआधीही वादांमध्ये अडकले होते

Actor Ranya Rao Gold Smuggling Charges : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर अटक करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तिला अटक केली. दुबईहून एमीरेट्सच्या विमानाने आलेल्या रान्याला सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून 14.8 किलो सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची किंमत जवळपास 12 कोटी रुपयांहून अधिक आहे. या अभिनेत्रीबाबत विविध प्रकारची माहिती समोर येते आहेत. त्यातच एक माहिती अशीही कळली आहे की तिचे वडील रामचंद्र राव हे पोलीस अधिकारी आहेत. ते पूर्वी काही वादग्रस्त आर्थिक प्रकरणांमध्ये सापडले होते. मात्र, सध्याच्या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जाणून घेऊ अधिक माहिती..

तिच्यावर आधीपासून नजर ठेवण्यात आली होती
रान्या रावने मागच्या वर्षभरात आखाती देशांमध्ये 10 तरी फेऱ्या केल्या आहेत. तसंच मागच्या 15 दिवसांत ती चार वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळे ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. रान्या राववर पोलिसांना संशय आलाच होता. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. रान्या मंगळवारी जेव्हा दुबईहून बंगळुरुला पोहचली तेव्हा तिला पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी थांबवलं. असंही सांगितलं जातं आहे की, एका पोलीसाच्या मदतीने तिने हे सगळं घडवलं. कारण तो पोलीस कॉन्स्टेबल तिला विमानतळातून बाहेर पडण्यासाठी मदत करायचा. 

तसेच, रान्या विमानतळावर पोहोचल्यानंतर आपण DGP ची मुलगी असल्याचे सांगून स्थानिक पोलिसांना बोलवत असे आणि त्यांच्यासोबत घरी निघत असे, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात काही पोलीस अधिकारी जाणूनबुजून मदत करत होते की, ते फक्त तिच्या नावावर विश्वास ठेवून मदतीसाठी जात होते, याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा - हल्लीच्या चोरांचा खरंच काही नेम नाही! कशाची चोरी केली.. केसांची.. तेही तब्बल एक कोटींच्या? विश्वासच बसत नाही

रान्या दुबईत तस्करीसाठी जात असावी असा संशय
जतीन हुक्केरी हा रान्याचा पती आहे. तो प्रतिथयश आर्किटेक्ट आहे. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह त्याच्याशी झाला होता. त्याचं किंवा त्याच्याशी संबंधित कुणाचंही काम दुबईत सुरु नाही, अशीही माहिती पोलिसांना मिळाली. ज्यामुळे रान्या दुबईत तस्करीसाठी जात असावी असा संशय पोलिसांना आला. एका वृत्तानुसार, रान्याने तिच्या कपड्यांच्या आतून सोनं लपवलं होतं. एक माहिती अशीही समोर येते आहे की, तिने दुबईच्या साधारण 30 फेऱ्या केल्या आहेत. यावेळी मात्र ती पकडली गेली. ज्यानंतर तिच्याकडे 12 कोटींचं सोनं आढळून आलं.

आयपीएस अधिकारी आहेत रान्या रावचे वडील रामचंद्र राव
रामचंद्र राव हे कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आज घडीला ते पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचे डीजीपी अर्थात पोलीस महासंचालक आहेत. त्यांनी याआधी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि इतर उच्चपदांवरही काम केलं आहे. कर्नाटक राज्य पोलीस निवास आणि विकास निगम लिमिटेडचे प्रबंध संचालक म्हणूनही त्यांनी पद भूषवलं आहे. मात्र, रान्या रावच्या या सोने तस्करीशी आपला काहीही संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही रामचंद्र राव हे नाव याआधी वादांमध्ये अडकलं आहे.

IPS रामचंद्र राव यांच्याबाबत अनेकदा वादग्रस्त स्थिती
म्हैसूर येथील बस लुटीच्या घटनेत त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. एका बंदुकधारी माणसाने काही पोलिसांनी बसची लूट करुन सव्वा दोन कोटी रुपये चोरले होते. या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली. ज्यानंतर बंदुकधारी माणसाला अटक झाली आणि राव यांची बदली करण्यात आली होती. अशा इतरही छोट्या वादांमध्ये त्यांचं नाव समोर आलं होतं. रान्या रावने 15 दिवसांत दुबईच्या चार फेऱ्या केल्या. त्याआधीही ती आखाती देशांमध्ये अनेकदा जाऊन आली आहे. त्यामुळे ती तस्करी करत असावी असा संशय पोलिसांना होताच, जो खरा ठरला. त्यावेळी मी डीजीपी रामचंद्र राव यांची मुलगी आहे असं सांगत तिने सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.

रामचंद्र राव यांनी रान्याच्या सोने तस्करीबाबत काय म्हटलं आहे?
रामचंद्र राव म्हणाले, 'रान्या रावने जे काही केलं त्याबद्दल मला काही माहीत नाही. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह जतीन हुक्केरी या प्रसिद्ध आर्किटेक्टशी झाला आहे. रान्याचा पती आणि त्याचे इतर व्यवसाय याबाबत मला काही माहीत नाही. तसंच तिने केलेल्या सोन्याच्या तस्करीशी माझा काही संबंध नाही. जे काही घडलं ते लाजिरवाणं आहे. तिच्याकडून गुन्हा घडला आहे. त्यामुळे आता कायदेशीर मार्गाने होणार आहे ते होईल' अशी प्रतिक्रिया रामचंद्र राव यांनी दिली आहे.

33 वर्षीय रान्या राव ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एका वृत्तानुसार, रान्या रावचे सावत्र वडील के रामचंद्र राव हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते कर्नाटक राज्य पोलीस दलात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. या सोने तस्करी प्रकरणामुळे संपूर्ण कर्नाटक आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. रान्याच्या या कारवाईनंतर पोलीस आणि अन्य वरिष्ठ अधिकारी मोठ्या दबावाखाली आले असून, पुढील तपास कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - 'महिलेने पुरूषावर केलेला प्रत्येक आरोप खराच आहे, असं मानता येणार नाही,' उच्च न्यायालय म्हणाले, 'हल्ली निष्पाप लोकांना अडकवण्याची…'

रान्या रावचा जन्म आणि शिक्षण
रान्या रावचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलूर या गावात झाला. तिने आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बंगळुरूमधून पूर्ण केलं. रान्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 2014 मध्ये रान्या रावने ‘माणिक्य’ या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने अभिनेता सुदीपबरोबर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे अत्यंत कमी वेळात तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
 


सम्बन्धित सामग्री