मुंबई : गूगल मॅपच्या माध्यमातून चूकीचे निर्देशन मिळल्याच्या घटना आपण वारंवार पाहत असतो. अशीच एक घटना समोर येत आहे. गूगल मॅपच्या मदतीने गोव्याला चाललेले बिहारचे कुटुंब थेट कर्नाटकच्या घनदाट जंगलात पोहचले. या कुटुंबाला रात्रभर जंगलात राहावे लागली.
उज्जैन येथील एकाच कुटुंबातील दोन जोडपी गोव्याला पिकनिकसाठी निघाले होते. गोव्याला जाण्याचा मार्ग समजण्यासाठी त्यांनी गूगल मॅपची मदत घेतली. परंतु गूगल मॅपच्या सहाय्याने ते थेट कर्नाटकच्या शिरोली येथील घनदाट जंगलात पोहचले.
जंगलात दूरवर गेल्यावर रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाटोत कुठलीही लोकवस्ती नाही, मोबाईलला नेटवर्कसुद्धा नाही. रस्ता माहिती नसल्यामुळे कुटुंबाला पुढेही जाता येत नव्हते. त्यामुळे अन्नपाण्याविना त्यांना रात्र जंगलात काढावी लागली.
घाबरून गेलेल्या कुटुंबाने नेटवर्क पहाटे चार किलोमीटर पायी रस्ता चालत इमर्जन्सी क्रमांक 112 वर कॉल करून मदत मागितली. कुटुंबाशी झालेल्या चर्चेनंतर खानापूर पोलिसांनी तात्काळ जंगलाच्या दिशेने धाव घेतली. 31 किलोमीटर प्रवास करून जंगलात अडलेल्या कुटुंबाची सुटका केली. त्यानंतर त्यांना गोव्याच्या दिशेने मार्गस्थ केले.