Wednesday, September 03, 2025 08:46:59 AM

भारतात 2 टप्प्यात होणार जनगणना! सरकारने जारी केली अधिसूचना

गृह मंत्रालयाने सोमवारी जनगणना कायदा, 1948 अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी संबंधित अधिसूचना जारी केली. 2011 नंतर करण्यात येणारी ही देशातील पहिली जनगणना असेल.

भारतात 2 टप्प्यात होणार जनगणना सरकारने जारी केली अधिसूचना
Census 2027
Edited Image

नवी दिल्ली: 2027 मध्ये होणाऱ्या जणगणनेसंदर्भात मोठी बातमी अपडेट समोर आली आहे. भारतात जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे की, भारताची जणगणना 2027 मध्ये केली जाईल. गृह मंत्रालयाने सोमवारी जनगणना कायदा, 1948 अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी संबंधित अधिसूचना जारी केली. 2011 नंतर करण्यात येणारी ही देशातील पहिली जनगणना असेल. अधिसूचनेनुसार, देशभरात जनगणनेची तारीख 1 मार्च 2027 निश्चित करण्यात आली आहे. तथापि, लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या बर्फवृष्टीग्रस्त भागात जनगणनेची तारीख 1 ऑक्टोबर 2026 ठेवण्यात आली आहे. या भागातील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु, कोरोना साथीमुळे जनगणना पुढे ढकलण्यात येत होती, परंतु आता अधिसूचना जारी झाल्यानंतर, जनगणनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील जनगणना 2035 मध्ये केली जाईल. तथापी, 20 ची जनगणना ही स्वतंत्र भारताची 17 वी जनगणना असेल. सरकारचे म्हणणे आहे की ही जनगणना देशाच्या धोरणात्मक नियोजन, संसाधन वाटप आणि कल्याणकारी योजनांना चांगली दिशा देण्यासाठी महत्त्वाची ठरेल.

हेही वाचा -  एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड! हाँगकाँगहून दिल्लीला येणारे विमान परतले

भारतात जात जनगणनाही होणार - 

दरम्यान, केंद्र सरकारने 2027 च्या जनगणनेसोबत जातींची जनगणना करण्याची औपचारिक घोषणा केली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मागण्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, देशाची सामाजिक रचना चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. 

हेही वाचा - मान्सूनचं रोद्र रुप दिसणार! गोवा-कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून रेड अलर्ट जारी

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सामान्य भागात जनगणनेची तारीख 1 मार्च 2027 असेल. त्याच वेळी, लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या भागात, जिथे हवामान सतत बदलत राहते, ते 1 ऑक्टोबर 2026 रोजी जनगणना केली जाईल. भारतात जातीचा डेटा 1931 मध्ये ब्रिटिश राजवटीत गोळा करण्यात आला होता. 
 


सम्बन्धित सामग्री