श्रीनगर : या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये ही तिसरी चकमक आहे; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तिघांसह या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी (2 ऑगस्ट 2025) सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत एक दहशतवादी ठार झाला.
“रात्रभर अधूनमधून आणि तीव्र गोळीबार सुरू राहिला. सतर्क जवानांनी कॅलिब्रेटेड गोळीबाराने प्रत्युत्तर दिले आणि संपर्क राखत नाकाबंदी कडक केली. आतापर्यंत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. कारवाई सुरूच आहे,” असे लष्कराच्या चिनार कॉर्प्सने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
शुक्रवार (1 ऑगस्ट 2025) संध्याकाळी सुरक्षा दलांची दक्षिण काश्मीरच्या कुलगामच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाशी चकमक झाली होती. “दक्षिण काश्मीरमधील कुलगामच्या अखल भागात चकमक सुरू झाली. पोलिसांचे विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG - Special Operation Group), सैन्य आणि सीआरपीएफ या मोहीमेत सहभागी आहेत,” असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.
या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये ही तिसरी चकमक आहे. आतापर्यंत या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले. यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांचाही समावेश होता.
हेही वाचा - ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा परिणाम! भारताने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमान खरेदीस दिला नकार
ही चकमक सुरू असलेल्या ठिकाणी आणखी किती दहशतवादी लपले असतील, याचा आकडा निश्चित करता आलेला नाही. श्रीनगरच्या दाचीगाम भागात झालेल्या चकमकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तिन्ही दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर काही दिवसांतच ही चकमक घडली.
शुक्रवारीची चकमक त्याच दिवशी घडली जेव्हा पोलिस महासंचालक (डीजीपी) नलिन प्रभात आणि काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक व्ही.के. बिर्डी यांनी कुलगामला भेट दिली. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी" जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी जीओसी व्हिक्टर फोर्स आणि जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या इतर अधिकाऱ्यांसोबत मोहीमेचा आढावा घेतला.
"तपासादरम्यान, तीन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, ग्रेनेड आणि एके-47 चे 41 राउंड जप्त करण्यात आले," असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली आहे. यात पुलवामा येथील कोएल येथील इश्फाक अहमद भट; ईशान अक्रम आणि वसीम रहमान शेख (दोघेही मेदोरा, अवंतीपोरा येथील) यांचा समावेश आहे.
हेही वाचा - यंदा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी तुमचं मत मांडणार! भाषणासाठी मागवल्या सूचना