नवी दिल्ली: तब्बल 5 वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. माहितीनुसार, हा प्रवास जूनपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2017 मध्ये झालेल्या डोकलाम वाद आणि कोविड-19 साथीमुळे हा दौरा तब्बल पाच वर्षांसाठी स्थगित करण्यात आला होता. सिक्कीममधील भारत-चीन सीमेवर असलेल्या या मार्गाची अंतिम तयारी आता सुरू आहे. येथील पायाभूत सुविधांचा विकास जवळपास पूर्ण झाला आहे. सिक्कीम येथील नाथुला खिंडीतून लोक कैलास मानसरोवरला जाऊ शकतील.
हेही वाचा: महाराष्ट्रातील 'या' 7 खासदारांना मिळाला संसदरत्न पुरस्कार
काय म्हणाले कामगार प्रभारी सुनील कुमार?
कामगार प्रभारी सुनील कुमार म्हणाले की, 'प्रवाशांसाठी बांधण्यात येणाऱ्या विश्रांती केंद्रांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी पुढील चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल'. पुढे ते म्हणाले की, 'कैलास मानसरोवर यात्रा लवकरच सुरू होणार आहे. तसेच, विश्रांतीसाठी या मार्गावर विश्रांती केंद्र बांधले जात आहेत. प्रत्येक केंद्रात 50 ते 60 लोक राहू शकतील.'
'कैलास मानसरोवर यात्रेच्या मार्गावर विश्रांतीगृह बांधण्यात येत आहे. पहिले केंद्र 10 हजार फुटांवर आहे आणि दुसरे कुपुप रोडवरील हांगू तलावाजवळ 14 हजार फुटांवर आहे. प्रत्येक केंद्रात दोन ते पाच बेड आणि दोन-दोन बेड असलेल्या इमारती असतील. त्यासोबतच, यात्रेकरूंसाठी वैद्यकीय केंद्र, कार्यालय, स्वयंपाकघर आणि इतर आवश्यक सुविधा देखील असतील', अशी माहिती कामगार प्रभारी सुनील कुमार यांनी दिली आहे.