Mahakumbh 2025: प्रयागराज येथे 45 दिवस चालणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि आध्यात्मिक मेळाव्याचा महाकुंभाचा (Mahakumbh 2025) समारोप महाशिवरात्री (Mahashivaratri 2025) च्या निमित्ताने झाला. या अभूतपूर्व 45 दिवसांच्या कार्यक्रमाची जगभरात चर्चा होत आहे. यापूर्वी जगभरातील कोणीही कोठेही कधीही श्रद्धेचा इतका महासागर पाहिलेला नाही. 45 दिवसांत 66 कोटी 30 लाखांहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. दररोज 1.25 कोटींहून अधिक भाविक पवित्र स्नान करत होते. या महाकुंभमेळ्याला 50 लाखांहून अधिक परदेशी भाविक आले. तसचे 70 हून अधिक देशांतील लोक प्रयागराजला पोहोचले. तथापी, अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट आणि जगभरातील 100 हून अधिक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी प्रयागराजला भेट दिली.
गंगा स्वच्छतेचा नवा विक्रम -
महाकुंभात गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. 360 लोकांच्या टीमने चार वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी एकत्र काम केले आणि ही एक नवीन कामगिरी बनली आहे. पूर्वी अशा स्वच्छता मोहिमांमध्ये कमी संख्येने लोक सहभागी होते, परंतु आता ही संख्या 360 पर्यंत पोहोचली आहे.
हेही वाचा - प्रयागराजच्या महाकुंभमेळ्याचा आज समारोपीय कार्यक्रम
हाताने रंगवण्याचा नवा विक्रम -
महाकुंभात हस्तकला क्षेत्रातही एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. या रेकॉर्डमध्ये एकूण 10102 लोकांनी एकत्रितपणे रंगकाम केले होते. यापूर्वीचे रेकॉर्ड 7660 जणांचा होता.
झाडू लावण्याचा रेकॉर्ड -
या स्वच्छ मोहिमेत एक नवीन टप्पाही नोंदवण्यात आला आहे. 19 हजार लोकांनी एकत्र झाडू लावून स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पाडली. यापूर्वी हा विक्रम 10 हजार लोकांनी केला होता. हे अभियान समाजात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करतेच, शिवाय सामूहिक प्रयत्नांची शक्ती देखील दर्शवते. या नोंदींसाठी प्रमाणपत्रे आज संबंधित अधिकाऱ्यांनी प्रदान केली आणि या कामगिरीबद्दल सर्व सहभागींचे अभिनंदन करण्यात आले. हे सर्व उपक्रम समाजाला स्वच्छतेचे आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व समजावून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सिद्ध होत आहे.
हेही वाचा - Mahakumbh 2025: प्रयागराज कुंभमेळा संपन्न: महाशिवरात्रीला अखेरचं स्नान
मुख्यमंत्री योगी यांनी 45 दिवसांत 10 वेळा महाकुंभनगरीला दिली भेट -
महाकुंभाच्या आयोजनाबाबत राज्य सरकार सुरुवातीपासूनच गंभीर होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 45 दिवसांत 10 वेळा महाकुंभनगरीला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. याशिवाय, त्यांनी लखनौ आणि गोरखपूर येथील नियंत्रण कक्षांमधून मेळ्यावर बारकाईने लक्ष ठेवले.
महाकुंभाती इतर विक्रम -
66.30 कोटींहून अधिक भाविक
अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट लोकांनी महाकुंभाला भेट दिली.
120 कोटी हिंदूंपैकी 66 कोटींहून अधिक हिंदूनी महाकुंभात पवित्र स्नान केले.
मेळ्याचा परिसर जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपेक्षा 166 पट मोठा आहे.
4 हजार हेक्टरमध्ये महाकुंभमेळा क्षेत्राची रचना
4 लाखांहून अधिक तंबू आणि 1.5 लाख शौचालये बांधली
दरम्यान, मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीमुळे महाकुंभाची प्रतिमा थोडीशी मलिन झाली, परंतु या घटनेचा भाविकांच्या श्रद्धेवर फारसा परिणाम झाला नाही. महाकुंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, स्टार्स आणि क्रीडा आणि उद्योग जगतातील व्यक्तिमत्त्वांपर्यंत, सर्वांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. तथापी, अनेकांनी योदी सरकारने केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले.