Thursday, September 18, 2025 08:13:36 AM

PM Narendra Modi Gifts Online Auction : पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव; तुळजाभवानीची मूर्ती 1 कोटींहून अधिक किमतीची

पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा यंदाचा हा सातवा लिलाव असून, त्यातून मिळणारी रक्कम 'नमामि गंगे' या गंगे' या गंगा नदीच्या स्वच्छतेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे.

pm narendra modi gifts online auction  पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव तुळजाभवानीची मूर्ती 1 कोटींहून अधिक किमतीची

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या खास भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव आजपासून (बुधवार, 17 सप्टेंबर) सुरू (PM Narendra Modi GIfts Online Auction Starts) झाला आहे. या लिलावात सुमारे 1300 वस्तूंचा समावेश असून, त्यातून मिळणारी रक्कम 'नमामि गंगे' या गंगा नदीच्या स्वच्छतेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. हा लिलाव येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.

यंदाचा हा सातवा लिलाव असून, यामध्ये पॅरालिम्पिक 2024 मधील खेळाडूंनी दिलेल्या वस्तू विशेष आकर्षणाचे केंद्र आहेत. लिलावातील वस्तूंची मूळ किंमत 1700 रुपयांपासून सुरू होते आणि सर्वाधिक किंमत 1.03 कोटी रुपये आहे. यामध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती, चित्रे, टोप्या, तलवारी आणि मंदिरांमधील कलाकृतींचा समावेश आहे.

हेही वाचा - PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 11 वर्षांत भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

या लिलावातील सर्वात महागडी आणि खास वस्तू म्हणजे तुळजा भवानीची मूर्ती, जिची मूळ किंमत 1.03 कोटी रुपये आहे. तसेच, पॅरालिम्पिक 2024 मधील रौप्यपदक विजेता निषाद कुमार आणि कांस्यपदक विजेते अजित सिंह व सिमरन शर्मा यांच्या शूजचाही या लिलावात समावेश आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांत सात हजारांहून अधिक भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. त्यातून एकूण 50.33 कोटी रुपये जमा झाले असून, ती रक्कमही 'नमामि गंगे' प्रकल्पाला देण्यात आली आहे.

हा लिलाव ऑनलाइन असून कुणीही व्यक्ती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून याच्यात सहभागी होऊन खरेदी करू शकता. आपण अधिकृत पोर्टल www.pmmentos.gov.in वर जाऊ शकता आणि ऑनलाईन बोली लावू शकता. येथे आपल्याला पेंटिंग्ज, शिल्पकला आणि पारंपारिक हस्तकला यासारख्या अनेक भेटवस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल.

हेही वाचा - Banjara Community- Vanjari Community : नाव सारखं, पण परंपरा वेगळी ; जाणून घ्या बंजारा व वंजारी समाजातील फरक


सम्बन्धित सामग्री