Monday, September 01, 2025 09:14:06 AM

Women's Day 2025 : 8 मार्च महिला दिनाची सुरुवात कधी झाली? जाणून घ्या सविस्तर

8 मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिकता नाही, तर महिलांच्या संघर्ष, सशक्तीकरण आणि त्यांच्या यशाचा उत्सव आहे.

womens day 2025  8 मार्च महिला दिनाची सुरुवात कधी  झाली जाणून घ्या सविस्तर

8 मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिकता नाही, तर महिलांच्या संघर्ष, सशक्तीकरण आणि त्यांच्या यशाचा उत्सव आहे. आज आपण जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास आणि त्यामागील प्रेरणादायी कथा. 

महिला दिनाची सुरुवात कशी झाली?
1908 मध्ये न्यूयॉर्क शहरात सुमारे 15,000 महिलांनी एकत्र येऊन आपले हक्क मागण्यासाठी मोठा मोर्चा काढला. त्यांनी समान वेतन, चांगल्या कामाच्या सुविधा आणि मतदानाचा हक्क या गोष्टींसाठी आवाज उठवला. हा आंदोलन इतका प्रभावी ठरला की 1910 मध्ये कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरवण्यात आली.

या परिषदेत जर्मनीच्या समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी प्रत्येक वर्षी एक दिवस महिलांच्या अधिकारांसाठी समर्पित करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव अनेक देशांनी मान्य केला आणि 1911 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे महिला दिन साजरा करण्यात आला.

8 मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो?
1917 मध्ये रशियामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले. त्यांनी युद्धविरोधी निदर्शने केली आणि आपल्यासाठी अधिक हक्कांची मागणी केली. या आंदोलनानंतर त्यांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला. हे ऐतिहासिक आंदोलन 8 मार्चला झाले होते आणि म्हणूनच हा दिवस महिला दिन म्हणून निवडण्यात आला.

1977 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केले. त्यानंतर संपूर्ण जगभरात हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जात आहे.आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. मग ते विज्ञान असो, क्रीडा, राजकारण किंवा व्यवसाय – महिलांनी आपल्या क्षमतेचा ठसा उमटवला आहे.


सम्बन्धित सामग्री