मुंबई : मंत्रालयात आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी आंदोलन सुरू केले आहे. धनगरांना मागास जमात म्हणून आरक्षण देणारा शासन निर्णय काढू नये अशी मागणी करत आमदारांनी आंदोलन सुरू केले आहे. मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारत आमदार नरहरी झिरवाळ, राजेश पाटील यांनी आंदोलन केले.
याआधी धनगड आणि धनगर हे एकच असून त्यांना मागास जमात म्हणून आरक्षण देणारा शासन निर्णय काढावा अशी मागणी करत धनगर समाजाने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. याच बैठकीत धनगरांचा प्रश्न सोडवण्याबाबत विचार होणार होता. पण आधीच आदिवासी आमदारांनी आंदोलन सुरू केले.