Wednesday, September 03, 2025 12:50:23 PM

आमदार धस यांचा अजित पवारांवर निशाणा

परभणीतील सर्वपक्षीय मूकमोर्चात आमदार सुरेश धस आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले.

आमदार धस यांचा अजित पवारांवर निशाणा

परभणी : बीड हत्येप्रकरणी आज परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला सर्वपक्षीय नेतेमंडळींचा सहभाग होता. यावेळी आमदार सुरेश धस आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. 

'सर्व आरोपींना मकोका लागायला हवा'

अगदी सुरूवातीपासून बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश टीका करत राहिले आहे. लातूरमध्ये झालेल्या मोर्चातही ते उपस्थित होते आणि आज परभणीत झालेल्या मोर्चातही ते उपस्थित होते. कोम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. बीडमध्ये आकासारखे कलाकार मंडळी असल्याची टीका आमदार धस यांनी केली आहे. आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का घेतले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आतापर्यंच्या हत्येची बेरीज करा, त्या कोणी घडवून आणल्या, त्याच्या मागचा मास्टरमाईंड कोण? हे जर तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला आणि बीडला, बारामतीची माणसे पाठवा, असे आवाहन देखील धस यांनी केले आहे. हा सर्व प्रकार केवळ एका समाजापुरता मर्यादित नाही. इतर सर्व समाजाला तिथे काय वागणूक मिळते.  ते पाहा, असे आव्हान देखील सुरेश धस यांनी अजित पवार यांना केले आहे.त्याचबरोबर सर्व आरोपींना मकोका लागायला हवा असही धस यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : बीड हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात
 

'आका जल्दी कर लो तयारी, निकलेंगी तेरी वारी'

बीडमधील मस्साजोग प्रकरणात सर्व आरोपींना मकोका लागायला हवा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.त्यामुळे या प्रकरणात आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने ही टीकेची झोड उठत आहे. यावेळीही आका जल्दी कर लो तयारी, निकलेंगी तेरी वारी अशी डायलॉगबाजी करत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

'अजित दादा क्या हुआ तेरा वादा?'
मस्साजोग हत्या प्रकरणात जे-जो दोशी असतील, त्यांना फाशी द्या, असे आता आका म्हणत आहेत.मात्र, आधी नीट वागायचे कोणी सांगत नव्हते का? असे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. मंत्री मुंडे अजित पवारांच्या पक्षातील असल्याने अजित पवारांना लक्ष्य केले आहे. अजित दादा 'क्या हुआ तेरा वादा?' असा प्रश्नही सुरेश धस यांनी अजित पवार यांना विचारला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री