Monday, September 01, 2025 10:52:32 AM

जरांगे विरोधक अजय बारस्कर यांच्या कुटुंबावर हल्ला

अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा येथे जरांगे विरोधक अजय बारस्कर यांच्या कुटुंबावर हल्ला झाला आहे.

जरांगे विरोधक अजय बारस्कर यांच्या कुटुंबावर हल्ला

नगर : अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा येथे जरांगे विरोधक अजय बारस्कर यांच्या कुटुंबावर हल्ला झाला आहे. जरांगे समर्थक मुसलमानांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती बारस्कर यांनी दिली आहे. गळ्यात भगवे उपरणे घालून मुसलमान तरुणांनी हल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

 

 

अजय महाराज बारस्कर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. दोन मद्यधुंद तरुण मनोज जरांगे समर्थक असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या मद्यधुंद तरुणानी बारस्कर यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी अजय महाराज घरापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये बसले होते.त्यांच्या आई आणि शेजारील व्यक्तीला मारहाण केल्याची फिर्याद त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे. 


सम्बन्धित सामग्री