Sunday, August 31, 2025 11:23:31 AM

बदलापूर ते नवी मुंबई प्रवास आता सुस्साट

राज्य सरकारने ठाणेकर, नवी मुंबईकरांना नव्या वेगवान प्रकल्पाची भेट दिली आहे

बदलापूर ते नवी मुंबई प्रवास आता सुस्साट

मुंबई : राज्य सरकारने ठाणेकर, नवी मुंबईकरांना नव्या वेगवान प्रकल्पाची भेट दिली आहे. बदलापूर ते नवी मुंबई विमानतळ प्रवास अतिवेगवान आणि सुकर करण्यासाठी प्रवेश नियंत्रण मार्ग (अॅक्सेस कंट्रोल रोड) बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या मार्गासाठी १० हजार ८३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो सेवेत दाखल झाल्यानंतर दोन शहरांतील अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे. 

कसा असेल नवा महामार्ग?

  • बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली शहरांच्या बाहेरून हा मार्ग जाणार
  • बदलापूर-नवी मुंबई प्रवेश नियंत्रण मार्ग ‘एमएसआरडीसी’च्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडणार
  • हा मार्ग नवी मुंबई विमानतळासह मुंबई-अहमदाबाद द्रुतगती महामार्ग, कल्याण वर्तुळाकार रस्त्याशी जोडला जाणार 
  • एकूण २० किमी लांबीचा हा मार्ग असेल
  • बदलापूर ते ठाणे दरम्यानची वाहतूक कोंडी टाळता येणार 
  • हा मार्ग तब्बल आठ पदरी असल्याने ताशी ८० किमी वेगाची मर्यादा राहणार 
  • मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हा मार्ग निर्णायक ठरणार

सम्बन्धित सामग्री