Thursday, September 04, 2025 08:17:56 PM

भावेश भिंडेला सत्र न्यायालयाकडून जामीन

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक केलेला इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

भावेश भिंडेला सत्र न्यायालयाकडून जामीन

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक केलेला इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. भिंडेने यापूर्वी अटकेच्या कारवाईला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र त्याची अटक कायदेशीरच असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या अर्जावर न्यायाधीश व्ही. एम. पाठाडे यांनी निर्णय दिला. घाटकोपरमध्ये १३ मे रोजी होर्डिंग कोसळून १७ लोकांचा मृत्यू तर ८० हुन अधिक लोक जखमी झाले होते. 

 


सम्बन्धित सामग्री