Wednesday, September 03, 2025 06:33:50 PM

अतिमुसळधार पावसाची शक्यता

अनुकूल वातावरणामुळे तो पुढील 24 तासांमध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

अतिमुसळधार पावसाची शक्यता

सर्वच जण थंडीने गारठले असतांनाच आता पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सर्वच जण थंडीने गारठले असतांना हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. मन्नारच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, अनुकूल वातावरणामुळे तो पुढील 24 तासांमध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुढील 48 तासांमध्ये दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

कुठे आहे अतिमुसळधार पावसाची शक्यता? 

पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमध्ये कडक्याची थंडी पडणार आहे. तर दुसरीकडे ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूरमध्ये दाट धुकं पडणार असून, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पाँडेचेरीमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्र थंडीने गारठलाय. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक शेकोटीची उब घेतांना दिसून येताय. त्यातच आता हवामान विभागाने चक्रीवादची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान या बदलत्या हवामानामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत असून शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे आता या बदलत्या हवामानाने अजून किती नुकसान होणार असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.  


सम्बन्धित सामग्री