Friday, September 05, 2025 04:22:20 AM

सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं असून न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केलीय.

सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यानंतर भारताचे पुढचे सरन्यायाधीश कोण असणार ? याची चर्चा सुरू होती.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं असून न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केलीय. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र पाठवलं आहे.  संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयात सध्या दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ते भारताचे ५१वे सरन्यायाधीश असतील. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात परंपरेनुसार सरन्यायाधीश चंद्रचूड यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात सरकारने सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला उत्तराधिकाऱ्याचे नाव देण्याची विनंती केली होती. यानंतर चंद्रचूड यांनी खन्नांच्या नावाची शिफार करणारे पत्र केंद्रीय कायदा मंत्रालयाला पाठवले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. 

सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे केंद्र सरकारला पत्र
सरन्यायाधीश चंद्रचूड १० नोव्हेंबरला होणार निवृत्त  

कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना ?

संजीव खन्ना यांनी १९८३ मध्ये दिल्ली बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून नाव नोंदणी केली होती
सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात वकीली केली
यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि ट्रिब्यूनलला काम केले
आयकर विभागाचे वरिष्ठ वकील म्हणून त्यांचा कार्यकाळ मोठा होता
सरन्यायाधीश म्हणून खन्ना यांचा कार्यकाळ ६ महिने इतकाच असेल, ते १३ मे २०२५ रोजी निवृत्त होतील.


सम्बन्धित सामग्री