Sunday, September 07, 2025 01:19:36 PM

वायू प्रदूषणावर समन्वय अधिकाऱ्यांचा वॉच

ऑक्टोबरमध्ये हवेची गुणवत्ता खालावत असल्याने मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

वायू प्रदूषणावर समन्वय अधिकाऱ्यांचा वॉच

मुंबई : ऑक्टोबरमध्ये हवेची गुणवत्ता खालावत असल्याने मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि त्यांची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेखीसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. 'वातावरणीय बदल: हरित दृष्टिकोन विकसित करण्याची गरज' या विषयावर पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बुधवारी बैठक झाली. त्यावेळी गगराणी यांनी अधिकाऱ्यांना वायू प्रदूषणाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. 


सम्बन्धित सामग्री