Sunday, August 31, 2025 05:40:36 PM

धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या वाहनाला अपघात

राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाला.

धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या वाहनाला अपघात

पुणे : राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाला. पुणे - सोलापूर महामार्गावर पहाटे अपघात झाला. धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या वाहनाची आणि खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या वाहनाची टक्कर झाली. या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या. राजश्री मुंडे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे राजश्री मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताचे कारण अधिकृतरित्या समजलेले नाही. पण दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे अपघात झाल्याचे समजते. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री