धुळे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध खात्यांमध्ये मंत्रिपद भूषवले. खान्देशात वलय निर्माण केले.
रोहिदास पाटील यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते.