Thursday, September 04, 2025 02:36:00 PM

सुख कळले, सूर जुळले; सामनातून फडणवीसांचे कौतुक

देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आले.

सुख कळले सूर जुळले सामनातून फडणवीसांचे कौतुक

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आले. नक्षलवाद्यांचा जिल्हायाऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटीही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. त्याबरोबरच देवाभाऊ, अभिनंदन! असा मथळा अग्रलेखाला देण्यात आला आहे. या अग्रलेखाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चांगलंय, धन्यवाद - मुख्यमंत्री फडणवीस

आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील नायगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. तेव्हा माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामनातील त्यांच्याविषयी आलेला अग्रेलखाबद्दल विचारले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चांगलंय, धन्यवाद असे म्हणत सामनाचे आभार मानले.

 

सामनातील स्तुतीनंतर राऊतांचं स्पष्टीकरण

ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केले आहे. फडणवीसांच्या चांगल्या कामाचं कौतुक का नको? असा प्रश्न त्यांनी केला आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी फडणवीसांनी पाऊलं उचलली, त्याचं कौतुक असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. सामनातून फडणवीसांचे कौतुक केल्यामुळे जवळीक निर्माण होण्याविषयी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर चांगल्या कामाचं कौतुक केलं त्यात जवळीक काय? असे म्हणाले आहेत.

मोदींच्या चांगल्या कामाचंही आम्ही कौतुक केलंय. पांडव गडचिरोलीत कौरवांचं काम करत होते अस म्हणत राऊतांनी नाव न घेता शिंदेंना टोला लगावला आहे. फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनातून स्तुती केल्याप्रकरणी राऊतांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.


सम्बन्धित सामग्री