Monday, September 01, 2025 09:12:36 PM

आता भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने

भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी आणि वीस वीस षटकांची मालिका ३ - ० अशी जिंकली. या निर्भेळ यशानंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

आता भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने

बंगळुरू : भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी आणि वीस वीस षटकांची मालिका ३ - ० अशी जिंकली. या निर्भेळ यशानंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यजमान भारत आणि पाहुण्या न्यूझीलंड संघात तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवार १६ ऑक्टोबरपासून बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांची कसोटी मालिका २०२४
सर्व सामने सकाळी ९.३० वा. सुरू होणार
पहिली कसोटी - बुधवार १६ ऑक्टोबर ते रविवार २० ऑक्टोबर - चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
दुसरी कसोटी - गुरुवार २४ ऑक्टोबर ते सोमवार २८ ऑक्टोबर - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
तिसरी कसोटी - शुक्रवार १ नोव्हेंबर ते मंगळवार ५ नोव्हेंबर - वानखेडे स्टेडियम, मुंबई

स्पोर्ट्स 18 नेटवर्क - टीव्ही वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण
जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाईट - थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रिमिंग)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप
राखीव खेळाडू : हर्षित राणा, मयंक यादव, प्रसिद्ध कृष्णा, नितीश रेड्डी

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकल ब्रेसवेल (फक्त पहिल्या कसोटीसाठी निवड), मार्क चॅपमन, डेव्होन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रूर्के, एजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र , मिशेल सँटनर, बेन सिअर्स, ईश सोढी (फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी निवड), टिम साउदी, केन विल्यमसन, विल यंग


सम्बन्धित सामग्री