Thursday, September 04, 2025 01:58:38 PM

इलेक्शन ड्यूटी नाकारल्यास जावू शकते नोकरी

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १९ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी आली आहे.

इलेक्शन ड्यूटी नाकारल्यास जावू शकते नोकरी

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १९ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी आली आहे. त्या सर्वांना त्यासंबंधीची पत्रे पाठविली आहेत. या कर्मचाऱ्यांचे शनिवारी, रविवारी पहिले प्रशिक्षण पार पडणार आहे. निवडणूक कामास नकार दिला किंवा कामावेळी कोणी गैरहजर राहिल्यास त्या कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०मधील कलम ३२ व १३४ नुसार थेट फौजदारी गुन्हा दाखल होतो. त्या कर्मचाऱ्याची चौकशी लागते आणि त्यामुळे ना पगारवाढ ना पदोन्नती मिळते. वेळप्रसंगी त्या कर्मचाऱ्याला कायमचे घरी देखील बसायला लागू शकते.


सम्बन्धित सामग्री