Monday, September 01, 2025 01:29:58 AM

Ladaki Bahin: नवीन वर्षात लाडक्या बहिणींना गिफ्ट; 'या' महिन्यात मिळणार पैसे

यंदाची सर्वात महत्वाची योजना ठरली ती लाडकी बहीण लाडकी बहीण योजना. यातच आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात हप्ता मिळणार असल्याचं समोर आलं आहे

ladaki bahin नवीन वर्षात लाडक्या बहिणींना गिफ्ट या महिन्यात मिळणार पैसे

महाराष्ट्र : यंदाची सर्वात महत्वाची योजना ठरली ती लाडकी बहीण लाडकी बहीण योजना. यातच आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात हप्ता मिळणार असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर डिसेंबर महिन्याची रक्कम पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

निवडणुकीच्या काळात महायुतीने "लाडकी बहीण योजनेचे पैसे १,५०० रुपयांवरुन २,१०० रुपये करु", असा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनी 'हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबर महिन्याची रक्कम दिली जाईल' असेही म्हटले होते. त्यामुळे आता योजनेचे पैसे कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून आहे. 

परंतु काही लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार असल्याने काही लाडक्या बहिणींना आपले अर्ज तर बाद होणार नाही ना? असा प्रश्न पडलाय. नेमके का होऊ शकतात अर्ज बाद पाहुयात: 

का होऊ शकतात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद?

१) लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे. ज्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढू शकतं. कारण आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची फेरपडताळणी होणार असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये अनेक महिलांचे अर्ज हे बाद होऊ शकतात.

२) ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण आता निकषा बाहेर बसणाऱ्या महिलांचा अर्ज हा बाद  केला जाईल. 

३) अर्ज बाद  केल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.

४) ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही.

५) ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील. तसंच मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असतील. तसंच सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

६) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहे.तसंच ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 
 


सम्बन्धित सामग्री