पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी अनंत चतुर्थीची पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, "दहा दिवस इतक्या लवकर निघून गेले, कोणालाही कळलेही नाही, कारण सर्वजण भक्तीत रमले होते. प्रार्थना आणि विधी करण्यात आले. मी सर्वांसाठी शांती आणि आनंदासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली. सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. सरकार देखील प्रयत्न करत आहे आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत केली जाईल. विसर्जनादरम्यान, सर्व नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पूर्ण सहकार्य करावे आणि वेळेवर विसर्जन करावे. गणेशोत्सव सुरळीतपणे, योग्य शिस्त आणि सुव्यवस्था राखून संपन्न होवो.
हेही वाचा : Ganesh Visarjan Miravnuk 2025 : 'हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा...'; मुंबईसह राज्यात आज गणपती विसर्जन सोहळा रंगणार
गेल्या दहा दिवसांपासून घरगुती, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज, अकराव्या दिवशी भाविका आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाचा उत्सव साजरा केल्यानंतर आधी दीड दिवसांचा, नंतर पाच दिवसांचा, पुढे सात दिवसांचा आणि आज अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.