Sunday, August 31, 2025 08:12:47 AM

महाराष्ट्रापेक्षा झारखंडमध्ये जास्त मतदान

प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या तुलनेत आदिवासी बहुल झारखंडमध्ये झालेल्या मतदानाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्रापेक्षा झारखंडमध्ये जास्त मतदान

मुंबई : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांत बुधवार 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर झाली आहे. प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या तुलनेत आदिवासी बहुल झारखंडमध्ये झालेल्या मतदानाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले. तर झारखंडमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६७.५९ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ६९.६३ टक्के  आणि मुंबई शहर जिल्ह्यात सर्वात कमी ४९.०७ टक्के मतदान झाले.


सम्बन्धित सामग्री