Sunday, August 31, 2025 08:05:59 AM

व्होट जिहादची खेळी मविआलाच भोवली

मविआला विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे.

व्होट जिहादची खेळी मविआलाच भोवली

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुतीच्या विरोधात अनेक इस्लामी फतवे निघाले. यामुळे मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद आणि एकगठ्ठा मतदान झाल्याचे दिसले. महाराष्ट्रात त्याचा मोठा परिणाम दिसून आला. महाविकास आघाडीला 48 पैकी जवळपास 30 जागा मिळाल्या. लोकसभेमध्ये मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाचा फायदा पुन्हा विधानसभेत होईल असा अंदाज मविआचा होता. मात्र मविआला विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा व्होट जिहादचा हुकुमी एक्का निकामी का गेला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुस्लिम मतांचे विधानसभा मतदारसंघाप्रमाणे विभाजन, हिंदुंची जागरूकता,  मुस्लिम जनतेमध्ये महाविकास आघाडी प्रति एकप्रकारची निराशा आणि एका जागेसाठी अनेक मुस्लिम उमेदवार अशा काही कारणांमुळे महाविकास आघाडीचा हुकुमी एक्का कामी आला नाही.   

 

मुस्लिम मतांचे विधानसभा मतदारसंघाप्रमाणे विभाजन

सर्वात पहिला मुद्दा अनेक विधानसभेच्या जागा मिळून एक लोकसभेची जागा तयार होते. त्यामुळे सहाजिकच ज्या जागेची मुस्लिम लोकसंख्या जास्त असते तिथे एकगठ्ठा मतदान करणे शक्य असते व फायद्याचे देखील ठरते. लोकसभा निवडणुकी दरम्यान तेच झाले व निकालावर त्याचा अधिक परिणाम झाला.
विधानसभेत विभाग छोटा असल्यामुळे मुस्लिमांची लोकसंख्या लोकसभेच्या मनाने कमी होती. त्यामुळे मुस्लिम लोकसंख्या विविध विधानसभा मतदारसंघांच्या हिशोबाने विभागली गेली.
उदा. लोकसभेत पुणे या मतदार संघामध्ये ज्या 6 विधानसभा मिळून एक लोकसभा मतदारसंघ बनतो, त्या ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या हि दीड लाख होती. परंतु, विधानसभेच्या वेळी मात्र हि संख्या कसब्या मध्ये 23 हजार, व कोथरूड मध्ये 39 हजार, अशा हिशोबाने पुण्याच्या 6 विधानसभा मतदारसंघाप्रमाणे विभागली गेली. या बाबीचा व्होट जिहाद वर खूप परिणाम झाला व लोकसभेच्या निवडणुकी पेक्षा वेगळे निकष आपल्याला विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.

 

हिंदूंची जागरूकता

 

विधानसभा निवडणुक काळात व्होट जिहाद झाला परंतु तो भगव्यासमोर निष्फळ ठरला. व्होट जिहादचा महाराष्ट्रामधील लोकसभेच्या जागांवर झालेल्या परिणामामुळे मुस्लिम वर्ग चांगलाच शेफारला होता. ठिकठिकाणी यासंबंधित घटनासुद्धा पाहायला मिळाल्या. ‘व्होट जिहाद’ मुळे त्यांची उर्मी एवढी वाढली. त्यांनी वेगवेगळ्या मागण्या महाविकास आघाडी पुढे ठेवायला सुरूवात केली. एवढेच काय तर, त्यांनी विधानसभेत 20 ते 30 टक्के जागांवर आरक्षण मागितले. त्यानंतर महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी त्या 17 मागण्यांचे पत्रक सगळ्यांनी पाहिलेच आहे. ज्यांनी मराठा आरक्षणावर चकार शब्द काढला नाही. त्यांनी आम्ही सत्तेत आलो तर मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देऊ असे आश्वासन दिले.  एवढेच नाही तर महाराष्ट्राच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी एक वणीच्या देवीची जमीन वक्फ च्या नावावरती करा ही पण मागणी त्यातलीच एक होती. त्यामुळे हिंदू जाणकारांमध्ये मध्ये एक प्रकारचा आक्रोश निर्माण झाला होता. त्यनंतर हिंदू ही सजग झाले होते. एकप्रकारे हिंदूंना बटेंगे तो काटेंगे याचे महत्व कळून चुकले होते. ज्यामुळे हिंदूंची मते एकवटली. आणि व्होट जिहाद निष्फळ ठरला.

 

मुस्लिम जनतेमध्ये महाविकास आघाडी प्रति एकप्रकारची निराशा

 

लोकसभेनंतर इंडी अलायन्सने दिलेल्या वचनांची पूर्ती झाली नाही. निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाने महाराष्ट्राच्या विधानसभेत 30 ते 40 टक्क्यांचे आरक्षण मागितले होते. पंरतु त्याचीही पूर्ती महाविकास आघाडीने केली नाही. सुरुवातीला, काँग्रेसने विदर्भातील 5 ते 6 यांच्यासह 18 मुस्लिम उमेदवार उभे करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु शेवटी विदर्भात फक्त एक आणि उर्वरित मुंबई विभागातून निश्चित झाले. यामुळे पक्षाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली
मुस्लिमाना कळले की महाविकास आघाडी फक्त विकासाच्या वचनांचे टिमकी वाजवत आहेत. प्रत्यक्षात काहीच करत नाही. यामुळे मुस्लिम समाजामध्ये मविआ आपल्याला फक्त एक व्होट बँकम्हणूनच बघत आहे अशी भावना मुस्लिम समाजामध्ये निर्माण झाली आणि मुस्लिम समाज निराश झाला.
याउलट मुस्लिम जनतेच्या मनात लाडकी बहीण व वेगवेगळ्या योजनांमुळे भाजपाविषयी एक चांगले चित्र निर्माण झाले होते. ज्याचा फायदा भाजपाला विधानसभेत झाला.

 

20 टक्के पेक्षा जास्त मुस्लिम मतदार असलेल्या जागा

 

भाजपा -

    • भिवंडी पश्चिम
    • औरंगाबाद पश्चिम
    • अंधेरी पश्चिम
    • अकोट
    • वांद्रे पश्चिम
    • सोलापूर मध्य
    • नागपूर मध्य
    • धुळे
    • सायन वाडा
    • कारंजा
    • पुणे कॅन्टोन्मेंट
    • रावेर
    • वाशीम
    • मलकापूर

 

काँग्रेस -

    • मालाड पश्चिम
    • लातूर शहर
    • मुंबादेवी
    • अकोला पश्चिम
    • धारावी

 

शिवसेना -

    • औरंगाबाद मध्य
    • कुर्ला
    • चांदिवली
    • नांदेड उत्तर
    • नांदेड दक्षिण
    • बीड

 

शिवसेना ठाकरे गट -

    • भायखळा
    • वर्सोवा
    • वांद्रे पूर्व
    • परभणी
    • कलिना
    • बाळापूर

 

राष्ट्रवादी काँग्रेस -

    • अमरावती
    • अणुशक्ती नगर

 

समाजवादी पक्ष -

    • मानखुर्द-शिवाजी नगर
    • भिवंडी पूर्व

 

राष्ट्रवादी शरद पवार गट -

    • मुंब्रा-कळवा
    • जालना

 

एआयएमआयएम -

    • मालेगाव मध्य

 

एका जागेसाठी अनेक मुस्लिम उमेदवार

 

काही ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघासाठी 7 ते 10 मुस्लिम उमेदवार उभे होते. एकूण 420 मुस्लिम उमेदवार विधानसभाच्या रिंगणात होते. त्यातील 150 लहान पक्षांचे होते तर 218 अपक्ष होते. त्यामुळे बरीच मुस्लिम मत विभागली गेली. छत्रपती संभाजी नगरमध्ये याचे उदाहरण पाहायला मिळाले .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री