Wednesday, September 03, 2025 10:44:53 PM

पोलिसांची मेडिकल टेस्ट आणखी तीन रुग्णालयांत

पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशिष्ट वय झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात येत असते.

पोलिसांची मेडिकल टेस्ट आणखी तीन रुग्णालयांत

मुंबई :  पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशिष्ट वय झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात येत असते. त्यासाठी शासनाच्या वतीने त्या ठराविक  खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते. या वैद्यकीय चाचणीमुळे त्यांना काही आजार असतील तर ते लवकर कळून त्यावर निदान करून उपचार करणे शक्य होणार आहे. पोलिसांना या वैद्यकीय चाचण्या करणे आणखी सुखकर जावे याकरिता कोकण आणि मुंबई विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.


सम्बन्धित सामग्री