Saturday, September 06, 2025 12:12:18 PM

Pune Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जनावेळी पुण्यातील मुख्य रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

पुणेकरांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पुणे शहर वाहतूक विभागाने महत्त्वाचे रस्ते बंद करण्यासोबतच पर्यायी मार्गांची माहिती जाहीर केली आहे.

pune ganpati visarjan 2025  गणेश विसर्जनावेळी पुण्यातील मुख्य रस्ते बंद पर्यायी मार्ग जाणून घ्या

पुणे: अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरभर गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मोठी गर्दी अपेक्षित आहे. पुणेकरांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पुणे शहर वाहतूक विभागाने महत्त्वाचे रस्ते बंद करण्यासोबतच पर्यायी मार्गांची माहिती जाहीर केली आहे.

शनिवारी सकाळपासून मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरू होणार असल्याने मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, शिवाजी रोड यांसारखे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील. दुपारनंतर कुमठेकर रोड, शास्त्री रोड, बाजीराव रोड यांवर वाहनांची हालचाल थांबवली जाणार आहे. सायंकाळी जे एम रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज रोडसह पुणे सातारा रोड व पुणे सोलापूर रोडवरही बंदी असेल.

वाहनचालकांच्या गैरसोयी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग आखले असून, शहरातील मुख्य चौकांवर अतिरिक्त पोलीस तैनात राहतील. पार्किंगची व्यवस्था काही ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे; मात्र लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, शास्त्री रोड व कर्वे रोड यांसारख्या भागांमध्ये ‘नो पार्किंग’ झोन घोषित करण्यात आले आहेत.

हेही वाचा:Pune Ganpati Visarjan 2025: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग जाहीर

पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, विसर्जन दिवशी घराबाहेर पडताना या वाहतूक बदलांची नोंद घ्यावी, शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरावी आणि पोलिसांना सहकार्य करावे. या नियोजनामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांची तसेच वाहनचालकांचीही गैरसोय कमी होईल.


सम्बन्धित सामग्री