Sunday, August 31, 2025 08:11:13 PM

राहुल गांधींचा भाजपच्या खासदाराला धक्का

संसदेत एकाच धक्का पाहायला मिळाला. संसदेत झालेल्या धक्काबुकीत भाजपाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झालेत.

राहुल गांधींचा भाजपच्या खासदाराला धक्का

दिल्ली : संसदेत एकाच धक्का पाहायला मिळाला. संसदेत झालेल्या धक्काबुकीत भाजपाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झालेत.  केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आणि याच वक्तव्याची चर्चा होऊन वाद निर्माण झाला.  या वक्तव्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपाने संसदेत निषेध आंदोलन केले. या आंदोलनावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी केलाय. 

काय म्हणाले प्रताप सारंगी? 
राहुल गांधींनी एक खासदाराला माझ्या अंगावर ढकलले, त्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो. मी पायऱ्यांवर उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी धक्का दिलेला खासदार माझ्या अंगावर पडला, असा सारंगी यांचा दावा आहे. दरम्यान, प्रताप सारंगी यांना या प्रकारानंतर तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांच्यावर सध्या दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

काय म्हणाले राहुल गांधी? 
या सगळ्या घटनेनंतर राहुल गांधी हे म्हणाले की, मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी भाजप खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमकावत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. मला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. भाजप संविधानावर आक्रमण करत आहे, हा मूळ मुद्दा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

दरम्यान संसदेत झालेल्या धक्काबुकीत भाजपाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झालेत.  केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आणि याच वक्तव्याची चर्चा होऊन वाद निर्माण झाला.  या वक्तव्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपाने संसदेत निषेध आंदोलन केले. या आंदोलनावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी केलाय. 


सम्बन्धित सामग्री