Thursday, September 04, 2025 09:15:36 PM

सिनेट निवडणूक मंगळवारी

मुंबई विद्यापीठ अधिसभा म्हणजेच सिनेट पदवीधर प्रवर्गाची निवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

सिनेट निवडणूक मंगळवारी

२१ सप्टेंबर, २०२४, मुंबई : मुंबई विद्यापीठ अधिसभा म्हणजेच सिनेट पदवीधर प्रवर्गाची निवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 
शिउबाठाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन एकलपीठाने तातडीने सुनावणी घेतली आणि सिनेट निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. 
मुंबई विद्यापीठ अधिसभा म्हणजेच सिनेट पदवीधर प्रवर्गाची निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे रद्द करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करत जोरदार निदर्शने केली होती. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध करत सरकारच्या धोरणांविरुद्ध आपल्या रोष सुद्धा व्यक्त केला होता. आता मुंबई विद्यापीठ अधिसभा म्हणजेच सिनेट पदवीधर प्रवर्गाची निवडणूक मंगळवारी २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री