Sunday, August 31, 2025 05:01:03 AM

मतदानाच्या दिवशीच मविआत फूट

मतदानाच्या दिवशीच मविआत फूट पडली. सोलापूर जिल्ह्यात मविआत उभी फूट पडली.

मतदानाच्या दिवशीच मविआत फूट

सोलापूर : मतदानाच्या दिवशीच मविआत फूट पडली. सोलापूर जिल्ह्यात मविआत उभी फूट पडली. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या सेनेला धक्का दिला. प्रणिती शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी सकाळीच अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. उद्धव ठाकरेंच्या सेनेने सोलापूर जिल्ह्यात दिलेला उमेदवार यामुळे अडचणीत सापडला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी मविआत घटक पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात सोलापूर काँग्रेसने घेतलेल्या निर्णयामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सेनेचा उमेदवाराच्या चिंतेत वाढ झाली आहे.

  

सम्बन्धित सामग्री