बीड : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप खोटे ठरले असून, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेंद्र लोढा यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी कधीही अनंत प्रतिष्ठानच्या रुग्णालयासाठी जमीन देण्याबाबत कोणतीही अट घातली नाही, उलट त्यांना मदत केली होती.
काही वर्षांपूर्वी, डॉ. महेंद्र लोढा आणि डॉ. राजेंद्र लोढा यांच्या अनंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृद्धाश्रम आणि एचआयव्ही रुग्णालय उभारण्यासाठी शिरसाळा येथे जमीन मिळवण्यात आली होती. त्या वेळी, तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पुढे जात होती. डॉ. महेंद्र लोढा यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांनी त्यांना केवळ मदतच केली, तर काही अटी घालून ट्रस्टमध्ये समावेश करण्याची कोणतीही मागणी केली नाही.
सुरेश धस यांचे खोटे आरोप ?
मात्र, सुरेश धस यांनी बीड येथील एका मोर्चात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत सांगितले की, त्यांनी अनंत प्रतिष्ठानच्या ट्रस्टमध्ये प्रवेश करण्यासाठी अटी घातल्या होत्या. डॉ. महेंद्र लोढा यांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे आणि पुढे काय म्हणाले, "सुरेश धस यांनी आमच्याशी चर्चा न करता आमच्या कुटुंबाच्या नावाचा वापर करून खोटे आरोप केले आहेत."
हे देखील वाचा : प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्यातील वाद चिघळणार
खरंच धनंजय मुंडे यांनी मदत केली ?
डॉ. महेंद्र लोढा यांनी अधिक स्पष्ट सांगितले, धनंजय मुंडे यांच्याकडून मिळालेली मदत सामाजिक कार्यासाठी अत्यंत उपयोगी ठरली. त्याचप्रमाणे, मुंडे यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून निधी मिळवण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
सुरेश धस यांची या पूर्वीची वक्तव्ये चुकीची ?
सुरेश धस यांचे आरोप केवळ यावरच थांबले नाहीत. त्यांनी यापूर्वी परळीतील व्यापारी अमोल डुबे यांच्या प्रकरणात देखील चुकीचे आरोप केले होते. त्याबाबत संपूर्ण कागदपत्रे बाहेर आली आणि त्यांचे आरोप खोटे ठरले. तसेच, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळेही सुरेश धस अडचणीत येण्याची आलेले आहे.
हे देखील वाचा : चंद्रकांत पाटलांचा सुरेश धस यांना घराचा आहेर ? काय आहे प्रकरण ?
सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणि महायुतीतचं सध्या खडाजंगी सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. असे असतांना डॉ. महेंद्र लोढा यांनी सर्व प्रकाराच्या खोट्या आरोपांचा धडाक्यात विरोध केला आहे असून महाराष्ट्राच्या राजकारणात अजून नवनवीन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढतात की थांबतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.