नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत पोलिसांना धमकीचा फोन आला असल्याची माहिती समोर आली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बॉम्बस्फोटाची ही धमकी देण्यात आली यानंतर पोलिसांनी आरोपावर गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
दारूच्या नशेत आरोपीने रविवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली असल्याची माहिती आहे. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तत्काळ तपास सुरू केला. मोबाईल नंबर ट्रेस करून आरोपीची ओळख पटली असून तो कोपरखैरणे परिसरातील रहिवासी आहे.
दरम्यान भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 217 (लोकसेवकाला खोटी माहिती देऊन त्याच्या कायदेशीर अधिकारांचा गैरवापर करण्यास प्रवृत्त करणे) आणि प्रतिबंध कायदा अंतर्गत आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली असून आरोपीचा शोध सुरु आहे.