Wednesday, September 03, 2025 08:52:00 AM

मतदानोत्तर अंदाजात महायुतीकडे कल

महाराष्ट्रात  मागील 5 वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मायबाप मतदार राजानं विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं.

मतदानोत्तर अंदाजात महायुतीकडे कल

मुंबई : महाराष्ट्रात  मागील 5 वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मायबाप मतदार राजानं विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. 23 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे मतदानोत्तर अंदाज समोर आले आहेत. बहुतांश अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, असे चित्र निर्माण झाले असले तरी महायुतीचे यश अटीतटीचे आहे. मविआच्या जागा वाढल्याचा अंदाज आहे. निकालाच्या अंदाजात भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरताना दिसत आहे.  

 

 

 


सम्बन्धित सामग्री