Monday, September 01, 2025 05:18:36 PM

लांब आणि गोल दुधी भोपळ्यामध्ये काय फरक आहे? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

बाजारात दुधी भोपळ्याचे दोन प्रकार उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गोल दुधी भोपळा आणि लांब दुधी भोपळा यांचा समावेश आहे. दोघांच्या प्रकारात आणि चवीत फरक आहे.

लांब आणि गोल दुधी भोपळ्यामध्ये काय फरक आहे खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

Difference between Long and Round Bottle Gourd : दुधी भोपळा आरोग्यासाठी वरदान आहे. हे पोषक तत्त्वांचे भांडार आहे. सध्या बाजारात दोन प्रकारचे दुधी उपलब्ध आहेत, लांब आणि गोल. त्यांच्यातील फरक काय आहे आणि कोणता दुधी भोपळा जास्त फायदेशीर आहे ते जाणून घ्या?

बाजारात भाजीपाल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. देशी काकडी आणि हायब्रिड काकडी, दोडका, दुधी भोपळा, पडवळ, देशी आणि विविध प्रकारचे टोमॅटो, लांब दुधी भोपळा आणि गोल दुधी भोपळा बाजारात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, अनेक वेळा लोक लांब दुधी भोपळा खरेदी करावा की गोल दुधी भोपळा खरेदी करावा, याबद्दल गोंधळ होऊ शकतो. लांब आणि गोल दुधी भोपळ्यामध्ये काय फरक आहे, त्याचे फायदे देखील वेगळे आहेत का, यातला कोणता प्रकार अधिक चवदार आहे, तुमच्यासाठी कोणता अधिक फायदेशीर असेल, ते जाणून घेऊ.

हेही वाचा - व्हिटॅमिन D अभावी हाडं होतात कमजोर; सूर्यप्रकाश मिळत नसेल तर मजबुतीसाठी हे 4 पदार्थ खा

दुधी भोपळा खाण्याचे फायदे काय आहेत आणि लांब आणि गोल दुधी भोपळ्यामध्ये काय फरक आहे?

लांब आणि गोल दुधी भोपळ्यामधील फरक
लांब आणि गोल दोन्ही दुधी भोपळा आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या भाज्या मानल्या जातात. भोपळा जितका कच्चा किंवा कोवळा असेल, तितकी भाजी चांगली बनते. बाजारात दुधी भोपळ्याचे दोन प्रकार उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गोल दुधी भोपळा आणि लांब दुधी भोपळा यांचा समावेश आहे. दोघांच्या प्रकारात आणि चवीत फरक आहे.

गोल भोपळ्याच्या प्रकाराला नरेंद्र माधुरी भोपळा म्हणतात. लांब भोपळ्याच्या प्रकाराला शिवानी माधुरी म्हणतात. गोल दुधी भोपळ्याला देशी दुधी भोपळा म्हणतात आणि त्याची चव चांगली असते. गोल भोपळा सहजपणे शिजतो. तर, लांब दुधी भोपळा कधीकधी संकरित असू शकतो आणि कधी कधी त्याला इंजेक्शन दिलेले असल्याची शक्यता असते. जर बाजारात लांब आणि गोल दुधी दोन्ही उपलब्ध असतील तर तुम्ही गोल दुधी खरेदी करावा. कोणताही दुधी खरेदी करताना, ते वरून गुळगुळीत आहे की नाही आणि देठ ताजे तुटलेले आहे का ते तपासा. अन्यथा, अनेक वेळा भोपळा आतून खराब म्हणजेच कोरडा झालेला असतो. अनेकदा तो शिजत नाही आणि त्याची चवही खराब होते.

हेही वाचा - सॉफ्टड्रिंक्स दारूपेक्षाही अधिक घातक.. तरीही सर्वजण मोठ्या आवडीने पितात!

दुधी भोपळ्यातील जीवनसत्त्वे
दुधी भोपळा ही एक अतिशय फायदेशीर भाजी आहे. त्यात फायबर आणि पाणी भरपूर असते. शिवाय, यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बीदेखील चांगल्या प्रमाणात आढळते. तसेच, भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे देखील आढळतात. दुधी भोपळ्यामध्ये झिंक, फॉलिक अॅसिड, तांबे आणि सेलेनियम देखील आढळते. त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. भोपळा पोट स्वच्छ ठेवण्यापासून ते तुमच्या एकूण आरोग्यापर्यंत सर्वासाठीच खूप फायदेशीर भाजी आहे. भोपळ्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यकृत निरोगी ठेवण्यासाठी भोपळा खाण्याचा सल्ला दिला जातो.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री