Thursday, September 04, 2025 01:08:58 PM

Beetroot Jam Recipe: बीटपासून जॅम कसा बनवायचा तुम्हाला माहिती आहे का?

बीट हे एक कंदमूळ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

 beetroot jam recipe बीटपासून जॅम कसा बनवायचा तुम्हाला माहिती आहे का

मुंबई : बीटला मराठीत बीटरूट असेही म्हणतात. बीटमध्ये लोह, जीवनसत्वे, फॉलिक अॅसिड, आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. बीट हे आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरले जाते. बीट हे एक कंदमूळ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 

बीटचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे बीट हे रक्त वाढवण्यासाठी फायद्याचे आहे. मात्र बऱ्याच लोकांना बीट खायला आवडत नाही. अशावेळी बीटचे जॅम आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

बीटपासून जॅम बनवण्यासाठी सोपी रेसिपी 

आवश्यक साहित्य:
3 मध्यम आकाराचे बीट (सोलून, किसून)
1 कप साखर
1 टेबलस्पून लिंबाचा रस
1/2 टीस्पून वेलदोडा पूड
1/2 कप पाणी

हेही वाचा : Indian Railway's Beautiful Routes : भारतातले निसर्गसौंदर्यानं नटलेले हे रेल्वे मार्ग तुम्हाला माहीत आहेत का? प्रवासादरम्यान दिसतील नयनरम्य दृश्यं

कृती:
बीट शिजवणे
एका भांड्यात 1/2 कप पाणी गरम करून त्यात किसलेले बीट घालावे. मध्यम आचेवर 10-15 मिनिटे शिजवा, जोपर्यंत बीट मऊ होत नाही.

साखर घालणे
बीट शिजल्यावर त्यात साखर घालून मंद आचेवर शिजवा. सतत ढवळा, जेणेकरून मिश्रण खाली लागणार नाही.

चिकटपणा आणणे
मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर त्यात लिंबाचा रस घाला. आवडीनुसार, वेलदोडा पूड घालून चांगले ढवळा.

जॅमची तयारी
मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करा. जॅम कोमट झाल्यावर स्टेरिलाइज केलेल्या बाटलीत भरून ठेवा.

तुम्हाला गुळाचा स्वाद आवडत असेल, तर साखरेच्या ऐवजी गूळ वापरू शकता. जॅमला गोडसर आणि सौम्य आंबट चव असते. लिंबाचा रस चवीनुसार कमी-जास्त करू शकता. हा जॅम ब्रेड, पराठा किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी उत्तम आहे.


सम्बन्धित सामग्री