Sunday, August 31, 2025 07:13:21 PM

हाडांच्या बळकटीसाठी दुध पिताय? मग दुधासोबत 5 गोष्टी नक्की घ्या...

दूध (Milk) पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दूध प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कॅल्शियम आणि विविध जीवनसत्त्व असणारे दूध फक्त हाडं मजबूत आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हाडांच्या बळकटीसाठी दुध पिताय मग दुधासोबत 5 गोष्टी नक्की घ्या

मुंबई: दूध (Milk) पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दूध प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कॅल्शियम आणि विविध जीवनसत्त्व असणारे दूध फक्त हाडं मजबूत आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असून त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. दुधातील पौष्टिक गुणधर्म वाढवण्यासाठी आपण त्यात 6 गोष्टी मिसळू शकता. यामुळे फक्त हाडंच नसून, संपूर्ण आरोग्य सुदृढ राहते.

दुधातील गुणधर्म 
दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारखे आवश्यक बहु-पोषक घटक आढळतात. यामुळे हाडं मजबूत, शिवाय स्नायू बळकट होतात. व्हिटॅमिन डीमुळे मेंदूचे कार्य सुधारते. जर आपल्याला फक्त दूध आवडत नसेल तर, आपण दुधात काही गोष्टी मिसळून पिऊ शकता.

हेही वाचा: केसांना जाड आणि मजबूत बनवण्यासाठी 'हे' 5 ड्रायफ्रुट्स 'संजीवनी'सारखे काम करतात

दुधात कोणते पदार्थ घालून प्यायल्याने फायदा होतो?

हळद 
बरेच जण दुधात हळद घालून पितात. याला गोल्डन मिल्कही म्हणतात. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. शिवाय त्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे संधिवात किंवा हाडांशी संबंधित इतर वेदना कमी होऊ शकतात.

आलं (अदरक)
दुधात आपण आल्याचा किस किंवा आल्याची पावडर घालू शकता. अपचन, मळमळ, उलट्यांचा त्रास होत असेल तर, दुधात आलं घाला. आल्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट प्रभाव असतो, ज्यामुळे उलट्या आणि अपचनाचा त्रास कमी होतो.

मध 
बरेच लोक साखरेऐवजी मध मिसळून दूध पितात. मधात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. घसादुखी आणि कफ कमी करण्यासाठी मध गुणकारी आहे. जर आपल्याला झोपेची समस्या असेल तर, दुधात मध घालून प्या.

दालचिनी 
दुधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यात शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जर तुम्ही मधुमेहग्रस्त आहात, तर दुधात दालचिनी पावडर घालून अवश्य प्यावे.

बदाम 
बदामामध्ये फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई इत्यादी पोषक घटक असतात. दुधात बदाम पावडर घालून प्यायल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदय निरोगी राहते.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री