एकीकडे वडिलांच्या जाण्याचं दुःख; दुसरीकडे बारावीचा पेपर. मृत सरपंच संतोष देशमुख यांची लेक यंदा बारावीला होती परंतु सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि देशमुख कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. वडिलांच्या न्यायासाठी वैभवी प्रत्येक आंदोलनात सहभागी झाली. न्यायासाठी लढत राहिली. राज्यात आजपासून बारावीचे पेपर सुरु झालेत. त्यातच आज दुःखाचा मोठा डोंगर बाजूला सारून वैभवी देशमुखने आज बारावीचा पहिला पेपर दिला.
हेही वाचा: तुषार भोसलेंकडून भुजबळांचा खरपूस समाचार
परीक्षेला जाण्यापूर्वी वैभवीने संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. जामखेड जवळील पाडळी गावातील महाविद्यालयात ती इंग्रजीचा पहिला पेपर देणार आहे. वडिलांचे दुःख बाजूला सारून वैभवी परीक्षेसाठी निघाली आहे. आजपर्यंत निघालेल्या प्रत्येक मोर्चात तिने वडिलांसाठी न्याय मागितला. याच संपूर्ण परिस्थितीत वैभवी ही परीक्षा देत आहे.
काय म्हणाली वैभवी देशमुख?
माझे वडील माझ्यासोबत नाहीत असा हा माझा पहिलाच पेपर आहे. मी सध्या नीट ची तयारी करत होते. त्यामुळे मी डॉक्टर व्हावे, असे माझ्या वडिलांना वाटत होते. मात्र, आज ते आमच्यात नाहीत. त्यांना जाऊन आज दोन महिने झाले मात्र घरात पाऊल ठेवले की त्यांची आठवण कायम येत असते. मात्र त्यांनी पाहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे असल्याचे वैभवी देशमुखने म्हटले आहे.