Sunday, August 31, 2025 08:14:05 PM

विषारी गॅस सिलिंडरचा श्वास घेऊन 27 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

मुंबईतील वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वसईतील तरुणाने विषारी वायूचा वापर करुन स्वतःचे जीवन संपवल्याची घटना पाहून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत.

विषारी गॅस सिलिंडरचा श्वास घेऊन 27 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

मुंबई: मुंबईतील वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वसईतील तरुणाने विषारी वायूचा वापर करुन स्वतःचे जीवन संपवल्याची घटना पाहून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी पूर्वतयारी केली होती. मृत्यूपूर्वी तरुणाने एक चिठ्ठी लिहून त्याला दारावर चिकटवले होते. एका गंभीर आजाराने हा तरुण ग्रस्त होता. तपासातून अशी माहिती समोर येत आहे की, या तरुणाने मोनोऑक्साइडचा वापर करुन स्वतःचे जीवन संपवले आहे. तरुणाच्या या कृतीने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


मोनॉक्साईड गॅसचा वापर करून तरुणाने केली आत्महत्या:

वसईतील 27 वर्षीय श्रेय अग्रवाल या तरुणाने मोनॉक्साईड गॅसचा वापर करून आत्महत्या केली. वसईमधील कमांड भागात स्पॅनिश व्हिलाच्या 'क्लस्टर-9' बंगल्यामध्ये श्रेयचा मृतदेह सापडला. श्रेयच्या बहिणीची तक्रार मिळाल्यानंतर नयागाव पोलीस बंगल्यावर पोहोचते. त्यानंतर पोलिसांची नजर दरवाज्याला लावलेल्या एका चिठ्ठीकडे जाते. त्यावर, 'आत कार्बन मोनॉक्साईड आहे, दिवे लावू नका' असा इशारा देणारी नोटीस चिकटवण्यात आली होती. 'नेमकं श्रेय अग्रवालने या विषारी वायूचे सिलिंडर कोठून आणले?' याचा तपस गुन्हे शाखा करत आहे. 

बंगळुरूमध्ये असलेल्या श्रेयच्या बहिणीने मुंबई पोलिसांना ई-मेल करून बेपत्ता भावाची माहिती विचारली होती. गेल्या आठवड्यात शनिवारी श्रेयचे कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. मात्र, त्यानंतर श्रेयचा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लाईव्ह लोकशन बघितल्यानंतर लक्षात आले की श्रेय मुंबईतील वसईमध्ये आहे. या लोकेशनच्या आधारे पोलीस त्याच्या बंगल्याजवळ पोहोचले. बंगल्याच्या दरवाज्यावर लावलेले पत्र पाहून पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाला बोलावलं. 


पोलिसांनी घरात प्रवेश करताच:

पोलिसांनी घरामध्ये प्रवेश केल्यानंतर, श्रेय मृतावस्थेत सापडला. त्याने विषारी गॅस सिलिंडरचा श्वास घेऊन आत्महत्या केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. श्रेयच्या चेहऱ्यावर इनहेलेशन मास्क (Inhalation Mask) होता, जो कार्बन मोनोऑक्साइड सिलेंडरला जोडला गेला होता. बेडजवळील भिंतीवर त्याने सुसाईड नोटही चिकटवली होती.


सुसाईड नोटवर श्रेयने लिहिले होते:

सुसाईड नोटमध्ये श्रेयने, "मी माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे, मी दोन मोठ्या आरोग्याच्या समस्यांमधून जात आहे. या आजारांवर कोणताही इलाज नाही. गेल्या दीड वर्षांपासून ही समस्या वाढत आहे. यादरम्यान, मी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण कोणीही मला मदत करू शकले नाही. या समस्यांमुळे माझी नोकरीदेखील धोक्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांत माझ्या कुटुंबीयांनी मला खूप प्रोत्साहन दिले'' लिहिले होते.  


सम्बन्धित सामग्री