विदर्भ मराठवाड्याच्या बॉर्डरवर असलेल्या पासोडी गावात झोपडीत झोपलेल्या मजुरांच्या अंगावर टिप्पर खाली करताना वाळू टाकल्याने, वाळू खाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पासोडी गावात चांडोळ मार्गावर पूलाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत होता. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: नाशकात तणाव; दर्ग्यावर कारवाई
पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतकांचे शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. अवैध वाळूचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आले. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्याच्या आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत.
दरम्यान अवैध वाळू वाहतुकीने 5 बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. वाळू खाली दबल्यानं 5 मजुरांचा मृत्यू झालाय यामुळे काही प्रमाणात मजुरांमध्ये भीतीचे वातारण दिसून येतंय. विदर्भ मराठवाड्याच्या बॉर्डरवर असलेल्या पासोडी गावात झोपडीत झोपलेल्या मजुरांच्या अंगावर टिप्पर खाली करताना वाळू टाकल्याने, वाळू खाली दबून या पाच मजुरांचा मृत्यू झालाय. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.