बीड : बीडमधून आणखीन एक धक्कादायक प्रकार आला आहे. बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकरणं संपता संपत नसल्याचं समोर येतं आहे. बीड जिल्ह्यातील देशमुख प्रकरण राज्यात गाजत असतानाच आणखी एका माजी सरपंचाला पंकजा मुंडे यांचे नाव सांगून एका खोलीत डांबले आणि त्याचे हातपाय बांधले. सरपंचांनी स्वतःची सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले. या माजी सरपंचाचे नाव ज्ञानेश्वर इंगळे असून ते केज तालुक्यातील कळंबआबा येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
माजी सरपंचाचे हातपाय बांधून त्याला बंद खोलीत डांबले. पंकजा मुंडे यांच्याकडून निधी देण्याचे आमिष दाखवून त्याच्यासोबत हा प्रकार केला. पीडित माजी सरपंचाने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : कोणत्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही?
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बीडमध्ये देशमुख प्रकरण तापलं असतानाच अशी घटना घडणे गंभीर आहे. बीडमधील एक एक घटना ऐकून लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.