Wednesday, August 20, 2025 05:23:44 PM

ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले

उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून ठाण्यात डिवचणारे बॅनर; 'Come on, kill me' विरुद्ध 'Come on, save me' वादात शिंदे-ठाकरे संघर्ष पुन्हा उफाळला, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण.

ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका परिसरात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना उद्देशून डिवचणारे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात उच्चारलेले वादग्रस्त विधान हायलाइट करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'Come on kill me' असं वक्तव्य केलं होतं. या विधानावरच या बॅनरमधून टोला लगावण्यात आला आहे. 'Come on kill me' म्हणण्याऐवजी जर 'Come on save me' असं म्हटलं असतं, तर शिंदे साहेब मदतीला आले असते, असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे.

हेही वाचा: 'नटसम्राटाची भाषा बंद करा, शेतकऱ्यांसाठी...; नाना पटोलेंची फडणवीसांवर बोचरी टीका

ठाण्यात झळकलेल्या या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे. बॅनर नेमके कुणी लावले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. मात्र बॅनरवर असलेला मजकूर पाहता, शिंदे गटाकडून ही प्रतिक्रिया असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे वर्धापन दिनी झालेल्या भाषणातील विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 'Come on kill me' या वाक्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, आगामी काळात या बॅनरवरून अधिक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री